GT vs SRH Playing 11: गुजरातची चिंता वाढली! महत्वाच्या सामन्यातून प्रमुख खेळाडू बाहेर, समोर आलं मोठं कारण

Hardik Pandya Injury Update: आज होणाऱ्या सामन्यात जर तो बाहेर झाला तर कशी असेल गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११ आणि कोण करू शकतो गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व? जाणून घ्या.
gt vs srh
gt vs srh saam tv

GT VS SRH IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज ६२ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात हार्दिक पंड्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या पाठीत दुखापत असल्याचे जाणवले होते.

ज्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नव्हता. मात्र तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता.

आज होणाऱ्या सामन्यात जर तो बाहेर झाला तर कशी असेल गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११ आणि कोण करू शकतो गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व? जाणून घ्या.

gt vs srh
IPL 2023 Points Table: KKR विरुध्दच्या पराभवानंतर CSK बाहेर? तर या २ संघांची झाली चांदी; पाहा काय आहे प्लेऑफचं समीकरण

गुजरात टायटन्स संघाला आज प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ हा गुणतालिकेत १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

जर आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला धूळ चारली तर गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा गुजरात टायटन्स संघ हा या हंगामातील पहिलाच संघ ठरू शकतो.

तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. मात्र अधिकृतरीत्या हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. असं असलं तरीदेखील सनरायझर्स हैदराबाद संघाचे लक्ष हे विजय मिळवण्यावर असणार आहे.

कारण कुठलाही संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडू पूर्णपणं फिट आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कुठलाच खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होणार नाहीये. (Latest sports updates)

gt vs srh
IPL 2023 Points Table: RCB कडून दारुण पराभव झालेला राजस्थानचा संघ अजूनही करू शकतो प्लेऑफमध्ये प्रवेश! फक्त करावं लागेल हे काम

तर दुसरीकडे गुजरातचा कर्णधार या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. कारण दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकत नाहीये. गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये जाण्याच्या वाटेवर आहे. जर प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर हार्दिक पंड्याची उपस्थिती महत्वाची असणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला आजच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स संभावित प्लेइंग ११: वृद्धिमान साहा( यष्टीरक्षक), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या/ केएस भरत, राहुल तेवतीया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा , राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयांक मार्कंडे, फझहलक फारुकी, भुवनेश्वर कुमार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com