
GT vs CSK IPL Match Highlights : आजपासून आयएपीलचा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायट्न्स या दोन्ही संघात झाला. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गुजरातच्या खेळाडूंनी कमाल खेळ दाखवत ५ गडी राखून चेन्नईला पराभूत केले. (Latest Marathi News)
चेन्नईच्या १७९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातची सुरुवात खराब झाली. चेन्नईचा युवा गोलंदाजने राजवर्धन हंगरगेकर याने गुजरातचा पहिला गडी बाद केला. राजवर्धनने चौथ्या षटकात पाचव्या चेंडूत रिद्धीमान साहाच्या रुपाने पहिला गडी बाद केला.
साहाने २५ धावा कुटल्या. साहा बाद झाल्यानंतर सुदर्शन आणि गिलने डाव सांभाळला. दोघांच्या संयमी खेळामुळे चेन्नईचं टेन्शन चांगलंच वाढलं. मात्र, राजवर्धनने १० व्या षटकात साई सुदर्शनला झेलबाद केले. सुदर्शनने १७ चेंडूत २३ कुटल्या.
सुदर्शन बाद झाल्यानंतरही शुभमन गिल फॉर्मातच होता. त्याने ३० चेंडूत अर्धशतक ठोकलं. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या १३ व्या षटकात स्वस्तात बाद झाला. पांड्याने ११ चेंडूत केवळ ८ धावा कुटल्या. (Latest Sports Update)
चेन्नईला शुभमन गिलच्या रुपात चौथा धक्का बसला. तुषार देशपांडेने १५ व्या षटकातील शेवटच्या चेंडूत गिलला बाद केले. गिलने ६३ धावा कुटल्या. गुजरातने १६ व्या षटकात १४५ धावा कुटल्या होत्या. त्यावेळी संघाला २४ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या.
त्यानंतर गुजरातला विजय शंकरच्या रुपाने पाचवा धक्का बसला. विजय शंकरने २१ चेंडूत २७ धावा कुटल्या. चेन्नईला दीपकची चहरचं षटक महागात पडलं. त्यानंतर गुजरातला शेवटच्या षटकात ८ धावा हव्या होत्या. मात्र, गुजरातने पहिल्या दोन चेंडू चेन्नईचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.