
Harbhajan singh ball of the century: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग हा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याची फिटनेस अजूनही तशीच आहे.
याची झलक लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाली आहे. शनिवारी त्याने इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करताना म. (Latest sports updates)
वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेल फलंदाजी करता होता. त्यावेळी इंडिया महाराजा संघाकडून हरभजन सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला. दरम्यान हरभजन सिंगने असा काही चेंडू टाकला की, सर्वच आश्चर्यचकित झाले.
इंडिया महाराजा संघाची गोलंदाजी सुरू असताना तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी हरभजन सिंगकडे सोपवण्यात आली होती. त्याने सुरुवातीला २ वाइड चेंडू टाकले. त्यानंतर त्याने ख्रिस गेलला क्लीन बोल्ड केले.
शेन वॉर्नने टाकलेला बॉल ऑफ द सेंच्युरी सर्वांनाच माहित आहे. मात्र हरभजनने टाकलेला चेंडू देखील बॉल ऑफ द सेंच्युरीपेक्षा कमी नव्हता. त्याने डाव्या हाताचा फलंदाज ख्रिस गेलला लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला.
तो चेंडू इतका फिरला की, थेट लेग स्टंपला जाऊन धडकला. मुख्य बाब म्हणजे युनिव्हर्स बॉसला हा चेंडू किती फिरेल याचा अंदाज देखील घेता आला नाही.
फलंदाजासह गोलंदाजी करणाऱ्या हरभजन सिंगला देखील विश्वास बसत नव्हता की, त्याचा चेंडू इतका फिरू शकतो. सुरुवातीला असे वाटत होते की, ख्रिस गेलची बॅट स्टंपला लागली आहे. मात्र रीप्लेमध्ये पाहिले असता स्पष्ट दिसून आले की, चेंडू स्टंपला जाऊन धडकला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.