
IPL 2022 पुर्वी जेव्हा गुजरातच्या संघाने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आपल्या संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले तेव्हा कोणालाही वाटले नसेल की हे पांड्या नावाचं वादळ थेट संघाला अंतील सामन्यात घेऊन जाईल. पांड्याला कर्णधार बनवण्याच्या अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते. कारण तेव्हा पांड्याचा फिटनेस आणि फॉर्म दोन्ही नव्हते. मागच्या आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला होता. टी-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) खराब कामगिरीनंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते, पण असे असतानाही गुजरात टायटन्सने पांड्याला कर्णधार बनवले.
पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएल 2022 (IPL 2022) च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गुजरातच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापेक्षा एक मोठी गोष्ट म्हणजे पांड्याने जगाला त्याची खरी ओळख दिली. पांड्या 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. तो एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे परंतु त्यापैकी कोणीही पांड्याची खरी प्रतिभा ओळखू शकले नाही.
तो एक अप्रतिम फलंदाज - पंड्याने सिद्ध केले
2021 मध्ये टी-20 विश्वचषक गमावल्यानंतर, पांड्याला फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकले नाही, अशी चर्चा सुरू झाली. जर तो गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याला टीम इंडियात संधी मिळू शकत नाही. परंतु पांड्याने आपल्या फलंजादीने सर्वांनी प्रभावित केले आणि या सर्व चर्चांना ब्रेक लावला आहे. पांड्याने यंदाच्या हंगामात फक्त चांगली फलंदाजीच केली नाहीतर संघाल कठीण काळात सांभाळले आणि विजय मिळवून दिला. पांड्याच्या फलंदाजीतील ही सुधारणा त्याला भारतीय संघात स्थान मिळवून देईल.
पांड्याने आयपीएल 2022 मध्ये 453 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 45.30 आहे. स्ट्राईक रेट 132 पेक्षा जास्त आहे तर त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. पांड्याचे हे आकडे उत्कृष्ट आहेत कारण त्याच्यावर दबाव होता. तो कर्णधारही होता आणि इतकंच नाही तर त्याने आपल्या फलंदाजीची जागा बदलली होती. तो सहाव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. पहिल्या क्वालिफायरमध्ये पांड्यानेही अप्रतिम फलंदाजी केली. 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप दडपण असते पण पांड्या घाबरला नाही. तो स्वत: पुढे आला आणि 27 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी खेळली. तो मिलरसोबत सपोर्ट रोलमध्ये दिसला ज्याने 38 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 106 धावांची अभेद्य भागीदारी करत आपल्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
धोनी, विराट आणि रोहितही पांड्याला समजू शकले नाहीत
इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्याने धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तो बराच काळ मुंबई इंडियन्ससोबत राहिला पण या खेळाडूची खरी प्रतिभा त्याला ओळखता आली नाही. पांड्या हा खेळाडू नसून फायटर आहे हे तो ओळखू शकला नाही. त्याला संघासाठी प्रत्येक सामना जिंकून पुढे जायचे आहे. त्याला प्रवाहाच्या विरुद्ध कसे वाहायचे माहिती आहे. पांड्या आता गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसला तरी आता हा खेळाडू फलंदाज म्हणूनही सामने जिंकू शकतो हे टीम इंडियाच्या दिग्गजांनी मान्य करायला हवे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.