हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

सध्या क्रिकेटपासून थोडा वेळ हार्दिक पांड्या लांब राहिला असला तरी देखील त्याची सोशल मीडियावर क्रेझही कायम आहे.
हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमनSaam Tv

मुंबई : सध्या क्रिकेटपासून थोडा वेळ हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लांब राहिला असला तरी देखील त्याची सोशल मीडियावर क्रेझही कायम आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसाअगोदर त्याने महागड्या घड्याळ्यांच्या किंमतीवरुन विमानतळावर काही कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यांच्याकडून टॅक्स ड्युटी कमी करण्याकरिता त्याने दबाब देखील आणला होता.

हे देखील पहा-

यामुळे त्याच्या नावाची चर्चा झाली होती. सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या गुड न्युजमुळे खूपच चर्चेत आला आहे. भारतीय (Indian) क्रिकेट संघात सुरु झालेला वाद याकारणामुळे त्याचा फटका हार्दिकला बसल्याचे दिसून आले आहे. भारतीय क्रिकेट संघात ऑल राउंडर म्हणून हार्दिक पांड्याचे नाव घेतले जाते. त्याची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने मागील वर्षी अचानक आपल्या लग्नाची (marriage) आणि प्रेग्नंसीची बातमी दिली होती.

हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप

यामुळे हार्दिक पांड्या आणि नताशा दोघेही कायम चर्चेत आले होते. जुलै २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव अगस्त्य असे आहे. आता नताशा आणि हार्दिकने ख्रिसमसच्या निमित्ताने काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी नताशाच्या प्रेग्नंसीविषयी काही सवाल केले आहेत. त्या फोटोला (photo) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत.

सध्या त्या दोघांनाही त्यांच्या फोटोवरुन ट्रोल करण्यात येत आहे. त्या फोटोमध्ये नताशाचा बेबी बंप लूक दिसून आला आहे. त्यामध्ये ती प्रेग्नंट असल्याचे दिसुन आले आहे. भले त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिले असले तरी देखील सेलिब्रेटींनी मात्र, त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याला आता पुनरागमनाचे वेध लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com