'ती' घड्याळं दीड कोटीची अन् जप्त झाली नाहीत; हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने दुबईहून पाच कोटी रुपयांची घड्याळे आणल्याची बातमी समोर आली होती.
'ती' घड्याळं दीड कोटीची अन् जप्त झाली नाहीत; हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण
'ती' घड्याळं दीड कोटीची अन् जप्त झाली नाहीत; हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरणSaam TV

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने दुबईहून पाच कोटी रुपयांची घड्याळे आणल्याची बातमी समोर आली होती. कस्टम विभागानाकडून घड्याळे जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी आता हार्दिक पांड्याचं वक्तव्य समोर आलं आहे. त्यानी हे आरोप फेटाळून लावले आहेत. घड्याळे जप्त करण्यात आलेली नसून ते सीमा शुल्काच्या मूल्यांकनासाठी गेले असल्याचे हार्दिकचे म्हणणे आहे. घड्याळांची किंमत पाच कोटी नसून दीड कोटी रुपये असल्याचा दावाही त्यांनी केला. भारतीय क्रिकेटपटूने 15 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले. हार्दिक पांड्याने सांगितले की, मी स्वत: ही घड्याळे सीमाशुल्क विभागाला दिली होती. ती जप्त करण्यात आलेले नाहीत. त्यांने घड्याळांची बिले व इतर कागदपत्रेही कस्टमला दिली आहेत. घड्याळांची कस्टम ड्युटी भरण्यास ते तयार आहेत, मात्र अद्यापपर्यंत वस्तूंचे पूर्ण मूल्यांकन सीमाशुल्क विभागाने केलेले नाही.

हार्दिकने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, '15 नोव्हेंबरला, सोमवारी सकाळी दुबईहून आल्यावर मी माझे सामान घेऊन मुंबई विमानतळावरील कस्टम काउंटरवर जाऊन माझ्या खरेदी केलेल्या वस्तूंची माहिती दिली आणि आवश्यक कस्टम ड्युटी भरली. मुंबई विमानतळावरील माझ्या माहितीबद्दल सोशल मीडियावर चुकीची प्रतिमा मांडली जात आहे आणि जे काही घडले ते मला स्पष्ट करायचे आहे. दुबईतून मी कायदेशीर मार्गाने खरेदी केलेल्या मालाची मी स्वतः माहिती दिली आणि जे काही शुल्क असेल ते भरण्यास तयार आहे. यावेळी कस्टम विभागाने खरेदीशी संबंधित सर्व कागदपत्रे मागितली आणि ती मी दिली. मात्र, कस्टम विभाग वस्तूंचे मूल्यमापन करत असून त्यातून जो काही कर निर्माण होईल, तो मी भरायला तयार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com