हिंगोलीचे क्रीडा कार्यालय भ्रष्टाचारी? ; 7 लाखांचे क्रीडांगण गेलं चोरीला
हिंगोलीचे क्रीडा कार्यालय भ्रष्टाचारी? ; 7 लाखांचे क्रीडांगण गेलं चोरीलाSaam TV

हिंगोलीचे क्रीडा कार्यालय भ्रष्टाचारी? ; 7 लाखांचे क्रीडांगण गेलं चोरीला

संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराच्या जागेला गावठाण दाखवून दहा गुंठे जमीन चक्क सव्वा दोन एकर पेक्षा जास्त दाखवत आहे.

संदीप नागरे

हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) क्रीडा विभागाचे कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनलं आहे. कारण गावात, शहरात तसेच अनेक शासकीय ठिकाणी क्रीडा विभागाच्या योजनेतून लाखो रुपयांचे अनुदान देऊन, तयार केलेले क्रीडांगण, व्यायामशाळा चक्क चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे, हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून देखील क्रीडा विभागाने मंजूर केलेली खुली जिम गायब झाली आहे, हे झालं शासकीय कार्यालयात, आता गावगाड्यात क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या योजनांची स्थिती काय आहे हे ही पाहुयात.

औंढा तालुक्यातील माळरानात वडचुना गाव आहे. या गावची लोकसंख्या १४०० असून गावात संत सेवालाल महाराज यांचे मंदिर व्हावे या साठी, गावकऱ्यांनी मागील पंधरा वर्षा पूर्वी त्यांच्या मालकीची असलेली जमीन ग्रामपंचायतीला दान केली, मात्र क्रीडा विभागाने ग्रामपंचायत मधील सरपंच आणि ग्रामसेवक यांना हाताशी धरून, शासकीय योजनेचा मलिदा लाटण्यासाठी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराच्या जागेला गावठाण दाखवून दहा गुंठे जमीन चक्क सव्वा दोन एकर पेक्षा जास्त दाखवत आहे.

हिंगोलीचे क्रीडा कार्यालय भ्रष्टाचारी? ; 7 लाखांचे क्रीडांगण गेलं चोरीला
'कत्तलखान्यात कापण्यासाठी बैलांचा समावेश करावा या आदेशाचे स्वागत'

क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. क्रीडा विभागाने या साठी सात लाखांचा निधी मंजूर केला, मात्र या ठिकाणी ना क्रीडांगण तयार झाले ना गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी कोणत्या उपाय योजना, त्या मुळे वडचुना गावात क्रीडा विभागाने सात लाखांचा निधी देऊन तयार केलेले सुसज्ज क्रीडांगण आणि जागा चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सह गटविकास अधिकारी व क्रीडा अधिकारी कार्यालयात दिली आहे. तसेच शासकीय योजनेतून तयार झालेल्या या क्रीडांगणाचा शोध घेऊन, गावकऱ्यांचे क्रीडांगण मिळून देण्याची मागणी केली आहे. लवकरच गावातील, कैलाश चीलगर, ओंकार राठोड, संजय चव्हाण यांनी आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.

दरम्यान या वडचुना गावात ज्या जागेत गावातील युवकांसाठी क्रीडा विभागाने क्रीडांगण तयार केलं तिथं खरंच क्रीडांगण आहे का याची पाहणी साम टिव्हीने देखील केली, तेव्हा तिथे तयार करण्यात आलेल क्रिंडागण खरंच गायब झाल असल्याचे आमच्याही निदर्शनास आलं. शासकीय योजनेतील अनुदानाचा मलिदा लाटण्याचा हा सर्व गंभीर प्रकार केवळ वडचुना गावातच नव्हेत तर शेकडो गावात घडली असल्याने अनेकांनी, या सर्व गावातील क्रीडा विभागाने केलेल्या योजनांची चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक गावातील पोलीस भरतीसह सैन्य दलात जाण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांच्या व नागरिकांच्या आरोग्यासाठी मैदाने तयार करण्याचा शासनाचा हेतू होता, या साठी हिंगोलीच्या क्रीडा विभागाने जिल्ह्यात या योजनेचे

सत्तर टक्के उद्दिष्ठ देखील पूर्ण केले. मात्र हे करत असताना, शासनाच्या धोरणांचाच क्रीडा विभागाने काळिम फासला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये व्यायामशाळा व क्रीडांगण यासाठी प्रत्येकी सात लाखांचा निधी देऊन, ही कामे कागदोपत्री दाखवले असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. अनेक ठिकाणी व्यायाम शाळेच्या इमारती पूर्ण झाल्याच मात्र साहित्य पोहोचले नाही, तर काही ठिकाणी काम सुरू असल्याचे क्रीडा विभागाने सांगितले आहे, जी कामे अपूर्ण आहेत ती कामे आता पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, हिंगोली जिल्ह्यात विविध गावातील आलेल्या तक्रारीची चौकशी देखील सुरू केल्याचे क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हिंगोलीचे क्रीडा कार्यालय भ्रष्टाचारी? ; 7 लाखांचे क्रीडांगण गेलं चोरीला
T-20 Wolrd Cup: ठरलं! हार्दिक पांड्या बाबत BCCI नं घेतला मोठा निर्णय?

मात्र क्रीडा अधिकारी , चौकशी करत असले तरी , या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून , हिंगोली चे जिल्हाधिकारी , व हिंगोली जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी देखील ,त्यांच्या स्तरावर विशेष पथक नेमून हिंगोली जिल्ह्यातील वसमत ,कळमणूरी, औंढा ,सेनगाव व हिंगोली या पाचही तालुक्यात क्रीडा विभागाने मंजूर केलेल्या योजनांची सखोल चौकशी सुरू केली आहे , त्या मुळे लवकरच , नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने धोरण ठरवून गावागावात क्रीडांगणे व्यायाम शाळेसाठी दिलेल्या निधीचा अपहार करून, भ्रष्टाचाराने बरबटलेले हात पुढे येतील यात शंका नाही.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.