हाॅकीपटू अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळकेची भारतीय संघात निवड

या स्पर्धेत गत विजेत्या अर्जेंटिनासह १६ संघ सहभागी हाेणार आहेत.
हाॅकीपटू अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळकेची भारतीय संघात निवड
akshata dekhale vaishnavi phalke

सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा भाग असलेली फॉरवर्ड लालरेमसियामी पाच डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे होणाऱ्या महिल्यांच्या ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान या संघात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील अक्षता आबासो ढेकळे हिची निवड झाली आहे. hockey junior women world cup 2021 akshata dhekale vaishnavi phalke in india squad satara phaltan

हॉकी इंडियाने नुकताच जाहीर केलेल्या संघात सलीमा टेटे आणि शर्मिला देवी या दोन ऑलिंपियननाचा समावेश केलेला आहे. क गटात स्थान मिळालेले भारतीय संघ सहा डिसेंबरला रशियाविरुद्ध सामना खेळेल. सात डिसेंबरला गतविजेत्या अर्जेंटिना समवेत तर नऊ डिसेंबरला जपानशी लढत हाेईल.

akshata dekhale vaishnavi phalke
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

दरम्यान या संघात प्रीती आणि प्रभलीन कौर यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना एखाद्या दुखापतीमुळे किंवा कोविड-१९ मुळे खेळाडू संघा बाहेर पडल्यास संधी मिळणार आहे.

“वरिष्ठ संघाचा अनुभव आणि काही उत्तम युवा प्रतिभावंत खेळाडूंमुळे आम्ही स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवू. संघाचा उत्साह वाढला आहे कारण जागतिक स्तरावरील स्पर्धा खेळण्यासाठी बराच काळ वाट पाहत आहाेत असे मुख्य प्रशिक्षक जेनेके शॉपमन यांनी संघाची घाेषणा झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

असा आहे भारतीय संघ

बिचू देवी खरीबम (गाेलकीपर), खुशबू (गाेलकीपर), अक्षता आबासो ढेकळे, इशिका चौधरी (उपकर्णधार), प्रियांका, मरिना लालरामनघाकी, अजमिना कुजूर, बलजीत कौर, रीत, वैष्णवी विठ्ठल फाळके, सलीमा टेटे, शर्मिला देवी, लालरेमसियाम (कर्णधार), सौंदर्य डुंगडुंग, दीपिका, मुमताज खान, संगीता कुमारी, जीवन किशोरी टोप्पो.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com