WTC Final: CSK चा हुकमी एक्का टीम इंडियाला बनवणार वर्ल्ड चॅम्पियन! सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात भीतीचं वातावरण

Ravindra Jadeja Record At Oval: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत
team india
team india saam tv

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना लंडनमध्ये असलेल्या केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत.

या सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजावर मोठी जबाबदारी असणार आहे. नुकताच त्याने चेन्नईला चॅम्पियन बनवलं आहे. आता त्याच्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान ज्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे, त्या मैदानावर कशी राहिलीये जडेजाची कामगिरी? जाणून घ्या.

team india
Vice Captain Of Team India: WTC फायनलसाठी रोहित शर्मा कर्णधार तर संघाचा उपकर्णधार कोण?

जडेजाची ओव्हल मैदानावरील कामगिरी..

रविंद्र जडेजाच्या ओव्हलच्या मैदानावरील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या मैदानावर २०१८ आणि २०२१ मध्ये २ कसोटी सामने खेळले आहेत. या २ सामन्यांमध्ये जडेजाने ४२.०० च्या सरासरीने १२६ धावा केल्या आहेत.

त्याने या मैदानावर ४ इनिंग खेळल्या आहेत. या चारही सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. फलंदाजीत जशी त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तशीच कामगिरी त्याने गोलंदाजी करताना देखील केली आहे.

त्याने ४ इनिंगमध्ये ११ गडी बाद केले आहेत. त्याची ओव्हलच्या मैदानावरील कामगिरी पाहून नक्कीच ऑस्टेलिया संघाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. (Latest sports updates)

team india
Team India Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यासाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11; प्रमुख गोलंदाजाला ठेवलं संघाबाहेर?

असा आहे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना जडेजाचा रेकॉर्ड..

रविंद्र जडेजाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १६ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २९.०० च्या सरासरीने आतापर्यंत ५२२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने १८.८६ च्या सरासरीने ८५ गडी बाद केले आहेत.

यादरम्यान ४२ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली असणार आहे. त्याची ही आकडेवारी पाहता नक्कीच तो ऑस्ट्रेलिया संघासाठी धोकादायक ठरू शकतो. भारतीय संघात रविंद्र जडेजासह, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांची तिकडी आहे. या तिघांमध्ये कोणाला संधी मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com