
IPL 2023 Playoffs: आयपील २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील केवळ ६ सामने शिल्लक आहेत. मात्र अजूनही प्लेमध्ये जाणारे ४ संघ कोणते हे कळू शकलेलं नाहीये. केवळ गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला आहे.
तर उर्वरित ३ स्थानांसाठी ७ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. अजूनही काही संघ असे आहेत, जे प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही संघर्ष करताना दिसून येत आहे.
तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आता प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. अशात मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये कसा जाऊ शकतो? समजून घ्या.
पंजाब किंग्ज संघाचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध आहे. या संघाचे १२ गुण आहेत. जर या संघाने अंतिम सामना जिंकला. तर पंजाब किंग्ज संघाचे जास्तीत जास्त गुण हे १४ होणार आहेत.
तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे १२ गुण आहेत. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे येणारा सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून मुंबई इंडियन्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरुचा संघ पराभूत होईल अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे. (Latest sports updates)
पराभूत होऊनही मुंबई जाणार प्लेऑफमध्ये, कसं ते जाणून घ्या.
मुंबईचा संघ आपला शेवटचा सामना गमावूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. यासाठी अट अशी आहे की, जर लखनऊ,चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपले उर्वरित सामने गमावले तर, नक्कीच मुंबईच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
मात्र जर मुंबईला दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून राहायचं नसेल तर, अंतिम सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पराभूत होऊनही जाऊ शकतो प्लेऑफमध्ये..
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गमावला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.
यासाठी मुंबईला पुढील सामन्यात पराभूत व्हावं लागेल. राजस्थानला मोठ्या फरकाने हरवल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नेट रन रेट चांगला आहे. याचा फायदा त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये होऊ शकतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.