ICC ने WTC 2023 साठी जाहिर केली नविन 'पॉईंट सिस्टिम'

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (ICC WTC 2023) चे वेळापत्रक व पॉईंट टेबलचे नियम व संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
ICC ने WTC 2023 साठी जाहिर केली नविन 'पॉईंट सिस्टिम'
ICC ने WTC 2023 साठी जाहिर केली नविन पॉईंट सिस्टिम Twitter/ @ICC

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (ICC WTC 2023) चे वेळापत्रक व पॉईंट टेबलचे नियम व संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत एक कसोटी सामना जिंकणार्‍या संघाला 12 गुण मिळतील. तर कसोटी सामना अनिर्णित झाला राहिला तर दोन्ही संघांना 6 गुण दिले जातील. याशिवाय सामना ड्रॉ राहिला तर 4 गुण देण्याचा नियम आयसीसीने काढला आहे.

पराभूत झालेल्या संघाला कोणतेही गुण मिळणार नाहीत. याबरोबरच आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 मधील संघांची रँक निश्चित करण्यासाठी विनींग गुणवत्ता देण्याचे ठरवले आहे. म्हणजेच, विजयी संघाकडे 100 टक्के गुण असतील. सामना बरोबरीत ठेवणाऱ्या संघाला 50 टक्के गुण मिळतिल. याशिवाय अनिर्णित राहिलेल्या कसोटीत संघांना 33.33 टक्के गुण मिळतील. पराभूत झालेल्या संघांचे कोणतिही विजयी टक्केवारी मिऴणार नाही.

ICC ने WTC 2023 साठी जाहिर केली नविन पॉईंट सिस्टिम
IRE vs SA: आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून रचला इतिहास

मालिकेच्या आधारावरही ठरवणार पाँईट

याशिवाय मालिकेच्या आधारेही गुण निश्चित केले गेले आहेत. जर एखाद्या कसोटी मालिकेत 2 कसोटी असतील तर त्याचे 24 गुण असतील. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण 36 गुण, 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 48 आणि 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 60 गुण निश्चित केले गेले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com