
ICC Mens T20I Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 च्या पुरस्कारांची घोषणा सुरू केली आहे. सोमवारी, वर्षातील पहिला ICC T20 आंतरराष्ट्रीय संघ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये भारतीय संघाचा दबदबा दिसून आला. या आयसीसी संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवचेही नाव आहे.
ICC कडून 2022 सालचे पुरस्कार जाहीर केले जात आहेत, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) व्यतिरिक्त, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या ज्यांना T20 संघात स्थान मिळाले आहे. या संघाची कमान ICC ने जोस बटलरकडे सोपवली आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने T20 विश्वचषक जिंकला होता.
या संघात भारताचे 3, पाकिस्तानचे 2, इंग्लंडचे 2, न्यूझीलंड-झिम्बाब्वे-श्रीलंका-आयर्लंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहे. म्हणजेच या आयसीसी पुरस्कारांमध्ये फक्त भारतीय संघमधील दोन फलंदाज आणि एका अष्टपैलूला स्थान देण्यात आले आहे.
आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर-
जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर)
मोहम्मद रिझवान
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
ग्लेन फिलिप्स
सिकंदर रझा
हार्दिक पांड्या
सॅम करन
वानिंदू हसरंगा
हॅरीस रौफ
जोश लिटिल
या संघाचा विचार करता भारताचे तीन, पाकिस्तानचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचं नाव ICC च्या सर्वोत्तम T20 संघात आहे. विशेष म्हणजे, यंदा आयसीसीनं 2022 च्या सर्वोत्कृष्ट T20 आंतरराष्ट्रीय संघात स्टार संघाशिवाय आयर्लंड आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे. याचं कारण या दोघांनी 2022 वर्षात टी20 फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.