IND vs SL: ICC ने श्रीलंकेच्या संघाला ठोठावला दंड

श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या (IND vs SL) दुसर्‍या वनडे (Second ODI) सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
IND vs SL: ICC ने श्रीलंकेच्या संघाला ठोठावला दंड
IND vs SLTwitter/ @OfficialSLC

श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या (IND vs SL) दुसर्‍या वनडे (Second ODI) सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यासह श्रीलंकेच्या संघाने मालिका देखील गमावली आहे. परंतु आता तिसरा फटका श्रीलंकेच्या संघाला बसला आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यजमान श्रीलंकेच्या संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात षटक टाकण्यासाठी वेळ लावल्यामुळे दंड ठोठावला आहे.

कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेला त्यांच्या सामना फीच्या 20 टक्के दंड आकारण्यात आला आहे. आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रंजन मदुगले यांना दासुन शनाका यांच्या नेतृत्त्वाखालील संघाने वेळेत षटके न टाकल्याबद्दल दोषी ठरवले आणि कर्णधारांसह उर्वरित संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार षटके संथ गतीने टाकल्यामुळे सामन्यापैकी २० टक्के दंड आकारला जातो. याव्यतिरिक्त, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग खेळण्याच्या अटींच्या कलम १६. १२. २ नुसार संघाला प्रत्येक सामन्यात षटक कमी टाकल्यामुळे एका गुणाने दंड ठोठावला जातो.

IND vs SL
Tokyo Olympics 2020: उद्या सुरु होणार महासंग्राम; इथे पाहू शकता LIVE

यामुळेच श्रीलंकेच्या संघाला आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दरम्यान त्यांच्या पॉइंट टेबलवर एक गुण गमावावा लागला. कर्णधार दासुन शनाकाला या गुन्ह्यास दोषी ठरवले आहे आणि शनाकाने गुन्हा कबूल केल्यामुळे औपचारिक सुनावणी घेण्याची आता गरज भासली नाही. मैदानातील पंच कुमार धर्मसेना आणि लिंडन हॅनिबल, तिसरे पंच रुचिरा पल्लियागुरुगे आणि चौथे पंच प्रजेथ रामबुकवेला यांनी श्रीलंकेच्या संघावर हे आरोप केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com