ICC ODI Rankings: SRH विरूद्धच्या सामन्यापुर्वीच विराटच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आली समोर; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Virat Kohli: विराट कोहलीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
virat kohli
virat kohli saam tv

ICC ODI Rankings: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आज होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

virat kohli
IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश

विराटच्या फॅन्ससाठी वाईट बातमी..

बुधवारी आयसीसीने वनडे फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विराट कोहली आता टॉप १० फलंदाजांच्या यादीतून बाहेर जायच्या वाटेवर आहे.

आयसीसीने नुकताच जाहीर केलेल्या यादीत विराट कोहली घसरून ८ व्या स्थानी पोहोचला आहे. ७१९ रेटिंग पॉईंटससह तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. लवकरच तो टॉप १० मधून बाहेर होऊ शकतो.

विराट कोहली आणि विराट कोहलीच्या फॅन्ससाठी ही अतिशय वाईट बातमी आहे. कारण गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीची आयसीसीच्या यादीत इतकी वाईट स्थिती कधीच नव्हती. आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरने ७२२ रेटिंग पॉईंट्ससह विराटला मागे सोडलं आहे.

युवा फलंदाज शुभमन गिल ७३८ रेटींग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी कायम आहे. बाबर आजम हा पहिल्या स्थानी कायम आहे. रोहित शर्मा ७०७ रेटिंग पॉईंट्ससह दहाव्या स्थानी कायम आहे. तर टी -२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा दबदबा सुरूच आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानी कायम आहे. (Latest sports updates)

virat kohli
IPL Points Table: CSK अन् MI ची चिंता वाढली! सोप्या भाषेत समजून घ्या प्लेऑफचं समीकरण

विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधील कामगिरी..

गेल्या अनेक वर्षांपासून विराट कोहलीचा वनडे क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून टॉप ५ फलंदाजांमध्ये राहणाऱ्या विराटला आता टॉप १० मधून बाहेर पडण्याची वेळी आली आहे.

विराटची वनडे क्रिकेटमधील कामगिरी पहिली तर, २७४ सामन्यांमध्ये विराटने ५७. ३२ च्या सरासरीने १२८९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४६ शतके आणि ६५ अर्धशतके झळकावली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com