World Cup: मुंबईचा 'सुर्या' संघात तर दिल्लीच्या दिग्गजाला डच्चू?

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indian) फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) एक आनंदाची बातमी आहे.
World Cup
World CupTwitter/ @BCCI

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indian) फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) एक आनंदाची बातमी आहे. उपलब्ध माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) भारतीय संघाची घोषणा करणार आहे आणि 15 सदस्यीय भारतीय संघात सूर्यकुमारचा समावेश होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सूर्यकुमार यादवचा संघात समावेश केल्याचे निवड समिती आणि कर्णधार विराट कोहली यांनी स्वागत केले असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

सूर्यकुमार गेल्या काही आयपीएल हंगामात (IPL 2021, IPL 2020) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि टी 20 आणि एकदिवसीय दोन्हीमध्ये भारतीय संघासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. आता निवडकर्ता त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकाचे तिकीट देण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे.

World Cup
IND vs ENG: पाचवा कसोटीत विराट सेना 85 वर्षांचा इतिहास बदलणार

सूर्या संघात सामील होणार हे निश्चित आहे परंतू श्रेयस अय्यरचा समावेश संशयास्पद आहे. अय्यर आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्यामध्ये दुखापत ग्रस्त होता, परंतू तो आता फिट आहे. निवडकर्त्यांनी त्याची फिटनेस आणि फॉर्मची चाचणी केल्याशिवाय संघात स्थान देणार नाहीत. निवडकर्ते अय्यरला डावलूही शकत नाहीत.

सुत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "सूर्याने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर आणि श्रीलंकेतील मालिकेत मर्यादित षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. सुर्यासोबतच मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा सदस्य राहुल चाहरही संघात स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे. चहरचा सामना वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी होणार आहे. तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे, दोघांनाही चहरकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी संघात स्थान पक्के केले आहे, त्यामुळे शिखर धवनला संघात स्थान मिळणे कठीण झाले आहे. शिवाय, इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे टी -20 मालिकेदरम्यान शिखर धवनला 'तिसरा सलामीवीर' म्हणून ठेवण्याच्या विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे धवनचा संघात समावेश करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com