
Team India Test Ranking: श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने लंकेच्या खेळाडूंना चारीमुंड्या चित केले. या विजयानंतर टी ट्वेंटी असो किंवा वनडे असो, टीम इंडियाच बेस्ट ठरताना दिसत आहे. यावर आता थेट आयसीसीनेही मोहोर लावली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार कसोटीमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे. आगामी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला मागे सारत पहिल्या क्रमाकांवर जाण्याचा मान मिळवला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी येणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाने मोठा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाला बसलेला फटका मोठा आहे कारण त्यांना मागे टाकून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक गाठला आहे.
कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी-
नवीन ICC कसोटी क्रमवारीत टीम इंडिया आता 115 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे १११ रेटिंग गुण आहेत. इंग्लंड 106 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर यावेळी भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ 100 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दोन फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानीः
कसोटी क्रमवारीतही प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर भारतीय संघाची आता दोन दोन प्रकारात सत्ता असणार आहे. याआधी भारतीय संघाने टी ट्वेंटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. त्यानंतर आता कसोटीमध्येही टीम इंडियाचं बेस्ट असणार आहे.
महत्वाचे म्हणजे भारतीय संघाची (Indian Cricket Team) आता तीनही फॉरमॅटमध्ये सत्ता येवू शकते. न्यूझीलंड संघाला एकदिवसीय मालिकेत ३-० ने हरवल्यास भारतीय संघ वनडेमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.