ICC Test Rankings: रुट टॉपर; 5 वर्षांत पहिल्यांदाच कोहलीवर नामुष्की

जो रुट आयसीसीच्या पुरुष कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) जवळपास सहा वर्षांनंतर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ICC Test Rankings: रुट टॉपर; 5 वर्षांत पहिल्यांदाच कोहलीवर नामुष्की
ICC Test RankingsSaam Tv

इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) भारताविरुद्ध सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात शतक झळकावले आहे. यासह, तो आयसीसीच्या पुरुष कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) जवळपास सहा वर्षांनंतर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर खराब फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टॉप -५ मधून बाहेर पडला आहे. रोहित शर्माने कोहलीला मागे सोडले आहे. रोहित कसोटीत भारताचा नंबर वन फलंदाज बनला आहे.

ICC Test Rankings
Video: पचांनी वाइड चेंडू दिला नाही; नाराज पोलार्डचा गंमतीदार विरोध

मालिका सुरू होण्यापूर्वी 30 वर्षीय जो रुट पाचव्या स्थानावर होता. पण तीन कसोटीत 507 धावांनी त्याला नंबर 1 फलंदाज बनवले. यामुळे इंग्लंडचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशॅगन, स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या पुढे जाण्यास मदत झाली. लीड्स कसोटीपूर्वी रूट दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्यात त्याने इंग्लंडच्या एकमेव डावात 121 धावा केल्या होत्या. रूट यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये पहिल्या स्थानावर होता. रूट व्यतिरिक्त विराट कोहली, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी गेल्या पाच वर्षांत आळीपाळीने पहिले स्थान मिळवले आहे. या चार व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स २०१५ मध्ये अव्वल स्थानावर होता.

दरम्यान, जो रुट भारतासाठी घातक फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीला मागच्या दोन वर्षात एकही शतक झळकावता आले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हालमध्ये खेळला जाणार आहे. मागच्या सर्व सामन्यात जो रुटने शतक झळकावले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com