Icc test ranking: इंदूर कसोटी सुरु असताना टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज! आर अश्विन बनला नंबर १ गोलंदाज

नुकताच आयसीसीने गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे.
R Ashwin
R AshwinSaam tv

ICC test ranking R ashwin : सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना सुरु असतानाच भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विनला एक गोड बातमी मिळाली आहे.

नुकताच आयसीसीने गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे. (Latest sports updates)

नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी अव्वल स्थानी विराजमान झालेल्या जेम्स अँडरसनला मागे सोडलं आहे.

R Ashwin
Ind vs Aus 3rd Test: पहिल्या सत्रात भारतीय संघ बॅकफुटवर! अवघ्या ८७ धावांवर अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूत

आर अश्विनने इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कसोटीत ६ गडी बाद केले होते. ३६ वर्षीय आर अश्विनने २०१५ मध्ये पहील्यांदा आयसीसीच्या गोलंदाजांच्या अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर अनेकदा तो अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची जोडी ही ऑस्ट्रेलिया संघासाठी डोकेदुखी ठरतेय. अश्विनने दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन सारख्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या डावात त्याने टॉप ५ फलंदाजांपैकी ३ फलंदाजांना माघारी धाडले होते.

R Ashwin
IND vs AUS 3rd Test: इंदोर कसोटीत मोडले जाणार मोठे विक्रम! अश्विन, जडेजा अन् सिराजकडे इतिहास रचण्याची संधी

आर अश्विनकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील उर्वरित २ सामन्यांमध्ये आणखी चांगली कामगीरी करून आपली रँकिंग आणखी मजबूत करण्याची संधी असणार आहे. आर अश्विन ८६४ रेटिंग पॉईंटसह अव्वल स्थानी आहे. तर जेम्स अँडरसन ८५९ रेटिंग पॉईंटसह दुसऱ्या स्थानी आहे.

गेल्या ३ आठवड्यात कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहचणारा आर अश्विन हा तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी जेम्स अँडरसन आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अव्वल स्थान मिळवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com