
ICC U19 Women's World Cup -News : आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. शनिवारी बेनोनी येथे खेळलेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ७ गडी राखून धूळ चारली. (Latest Marathi News)
कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) धमाकेदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने १६७ धावांचे दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गडीसाठी ७७ धावांची भागिदारी रचली.
शेफालीने १६ चेंडूवर ४५ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार आणि एका षटकाराचा सामावेश आहे. शेफालीला स्मिटने बाद केले. त्यानंतर श्वेताने तृषा आणि सौम्या तिवारीसोबत खेळत टीम इंडियाला जिंकवून दिलं. श्वेताने ५७ चेंडूत नाबाद ९२ धावा कुटल्या. यात धावात २० चौकारांचा सामावेश आहे.
लॉरेन्सने आफ्रिकेसाठी ठोकलं अर्धशतक
नाणेफेकी जिंकून मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) सुरुवातीला चांगली सुरुवात केली. चार षटकात ५६ धावा ठोकल्या. मात्र, सोनम यादवने रेन्सबर्गला बाद करून पार्टनशिप तोडली. रेन्सबर्गने १३ चेंडूमध्ये २३ धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार ओलुहले सियोला शेफालीने त्रिफळाचित केले.
दोन गडी बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेवर टीम इंडियाचा दबाव वाढला. यामुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकात १६६ धावा करू शकली. सलामीवीर लॉरेन्सने ४४ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या आधारावर ६१ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शेफाली वर्माने सर्वाधिक दोन गडी बाद केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.