KL Rahul: केएल राहुल सारखा खराब ओपनर पाहिला नाही, व्यंकटेश प्रसादचा निशाणा

दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही राहुलचा खराब फॉर्म दिसून आला आहे.
KL Rahul
KL Rahul

KL Rahul: भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने अलीकडच्या काळात केएल राहुलवर जोरदार टीका केली आहे. केएल राहुलची कसोटी सरासरी सुमार असल्याचं बरेच जण बोलत आहेत. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही राहुलचा खराब फॉर्म दिसून आला आहे. त्यामुळे व्यंकटेश प्रसादला पुन्हा राहुलवर निशाणा साधला.

व्यंकटेश प्रसादने एकापाठोपाठ एक ट्विट करत केएल राहुलवर जोरदार हल्ला चढवला आहे. केएल राहुलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्यंकटेशन प्रसाद हा एकटाच नाही. केएल राहुलमुळे शुभमन गिल सारखा खेळाडू बाहेर बसल्याचं बोललं जात आहे. (Latest Sports Updates)

KL Rahul
Ravindra Jadeja:'हे' केवळ सर जडेजाला जमलंय! ७ गडी बाद करताच जडेजाने रचला इतिहास

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही. व्यंकटेश प्रसादने ट्विटर म्हटलं की, केएल राहुलचा धावांचा दुष्काळ सुरूच आहे. व्यवस्थापनाच्या आग्रहास्तव केएल राहुलला संघात संधी मिळत आहे. कोणत्याही भारतीय फलंदाजाने किमान 20 वर्षांत इतक्या कमी सरासरीने इतके कसोटी सामने खेळलेले नाहीत. जाणूनबुजून प्रतिभावान खेळाडूंना दूर ठेवले जात असल्याचे व्यंकटेश लिहित आहेत

KL Rahul
IND VS AUS 2nd Test:मैदानात पाऊल ठेवताच विराटनं पूर्ण केलं खास 'शतक', असा कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

शिखर धवनची कसोटीत सरासरी 40 पेक्षा जास्त आहे. मयंकची सरासरी 41 पेक्षा जास्त असून त्यात दोन द्विशतकेही आहेत. शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. सरफराजची प्रतीक्षा संपलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असं व्यंकटेश प्रसादने म्हटल.

नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात राहुलने पहिल्या डावात 20 धावा केल्या होत्या. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून अर्धशतक झळकावले होते. दिल्ली कसोटीपूर्वी राहुलच्या १० कसोटी सामन्यांचा आकडा पाहिला, तर त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके आली आहेत. एकदिवसीय आणि टी-20 मध्येही तो सातत्यपूर्ण खेळू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com