
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील अखेरचा सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी करो या मरो असाच ठरणार आहे. कारण हा सामना जो जिंकेल त्या संघाला मालिका विजय मिळवता येणार आहे. पहिला वनडे सामना सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्या ऑस्ट्रेलियाने (Australia) टीम इंडियाचा १० विकेट्सनी दारुण पराभव केला होता. (Latest Sports News)
त्यामुळे तीन सामन्याची वनडे मालिका १-१ अशी बरोबर आली आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात झालेल्या चुका टाळून आजचा सामना जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. पण या सामन्यात जो संघ टॉस जिंकेल तोच सामन्यात यशस्वी होईल, असे समोर आले आहे. कारण चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचा पीच रिपोर्ट आता समोर आला आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे घरेलू मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर आजवर गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. चेपॉकचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर इथे सरासरी धावसंख्या ही २६० पेक्षा जास्त झालेली नाही. त्यामुळे या सामन्यात जास्त धावा होणार नाहीत, ही पहिली गोष्ट निश्चित आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या सामन्यात पाऊस पडू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा फलंदाजांसाठी ही वाईट बातमी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या खेळपट्टीवर अशा काही गोष्ट घडू शकतात ज्यामुळे फलंदाजांची समस्या वाढणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी (India vs Australia) महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रिडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.
अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग-११
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया
स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.