IND vs AUS : पाचव्या दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडूला गंभीर दुखापत

चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं तर दूरच पण पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाचवा दिवस खेळून काढणं गरजेचं आहे.
 IND vs AUS 4th Test Match
IND vs AUS 4th Test MatchSaam TV

IND vs AUS 4th Test Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेचा चौथा कसोटी सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला आहे. पहिल्या दिवसांपासून वरचढ दिसणारा ऑस्ट्रेलियन संघ सामन्याच्या पाचव्या दिवशी काही प्रमाणात बॅकफूटवर आला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं तर दूरच पण पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाचवा दिवस खेळून काढणं गरजेचं आहे.  (Latest Sports News)

 IND vs AUS 4th Test Match
MI vs UPW : मुंबईचा विजयी चौकार! हरमनप्रीतच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर UP वॉरियर्सचा 8 विकेटनी धुव्वा

अशातच पाचव्या दिवशीच्या सुरूवातीआधीच ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांचा जोरदार फॉर्ममध्ये असलेला सलामीवर फलंदाज उस्मान ख्वाजा हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळेच चौथ्या दिवशीच्या खेळामध्ये तो फलंदाजीसाठी उतरू शकलेला नाही.

ऑस्ट्रेलियाला चौथ्या कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी पाचवा दिवस खेळून काढणे खूपच गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने चांगली फलंदाजी केली होती. मैदानावर क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली. (Sports News)

त्यामुळे चौथ्या दिवशी चहापाण्याच्या सत्रानंतर ख्वाजा हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. ख्वाजाची दुखापत गंभीर असल्याचे समजत आहे. त्यामुळे ख्वाजा आता पाचव्या दिवशी फलंदाजीला उतरणार का नाही, हे अजूनही समजू शकलेले नाही. जर ख्वाजाची दुखापत गंभीर असेल तर तो फलंदाजीला उतरू शकणार नाही आणि हा ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का असेल.

 IND vs AUS 4th Test Match
Video : उगाच किंग नाही विराट! शतक झळकावताच स्टेडियममध्ये दिसला अद्भुत नजारा; टाळ्यांचा कडकडाट, चाहते नतमस्तक

टीम इंडियाला विजयाची संधी

यापूर्वीचे दोन कसोटी सामने जिंकून टीम इंडियाने (Team India)  बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यातच चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने केलेल्या विराट खेळीमुळे टीम इंडियाच्या विजयासाठी आशा वाढल्या आहेत. पाचव्या दिवशी जर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज लवकर बाद होत गेले तर त्यांचा पराभवही होऊ शकतो.

कारण पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीला पोषक असेल. त्यामुळे भारताचे तिन्ही फिरकीपटू चांगल्या फॉर्मात असतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता पाचव्या दिवशी किमान ६० षटके तरी खेळावी लागतील. जर ऑस्ट्रेलियाचा संघ ६० षटके खेळू शकला नाही तर त्यांचा पराभव होऊ शकतो. त्यातच उस्मान ख्वाजा हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाजच बाद करावे लागतील.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com