
WTC FINAL 2023 points table: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तर अंतिम फेरीत जाणारा दुसरा संघ कोणता असेल याचा आज निकाल लागणार आहे. (Latest sports updates)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला होता.
तर भारतीय संघाने प्रत्युत्तर देत ५७१ धावा करत आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तरऑस्ट्रेलिया संघाला लवकरात लवकर ऑल आउट करावं लागणार आहे.
तर ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना वाचवायचा असेल तर कमीत कमी ६० षटके भारतीय गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.
हा सामना जिंकून भारतीय संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. मात्र सामना ड्रॉ राहिला किंवा भारतीय संघ पराभूत झाला तर काय? तरीदेखील भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
कारण क्राईस्टचर्चच्या मैदानावर श्रीलंका विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या वाटेवर आहे. जर न्यूझीलंडचे फलंदाज टिचून फलंदाजी करत राहिले. तर न्यूझीलंड संघ हा सामना जिंकू देखील शकतो.
न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी २८५ धावांची गरज आहे. तर दुसऱ्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ३ गडी बाद १२९ धावा केल्या आहेत. विजय मिळवण्यासाठी अजूनही १५६ धावांची गरज आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ ६०.२९ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
तर श्रीलंका संघ ५३.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाने जर चौथ्या कसोटीत विजय मिळवला तर भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला किंवा सामना अनिर्णित राहिला तर श्रीलंका संघ अंतिम फेरीत जाण्याची शक्यता वाढणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.