
India vs Australia Visakhapatnam Match : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा संपूर्ण संघ 117 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कच्या धारदार गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्कारली.
अवघ्या 50 धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतला. त्यानतंर भारताचा डाव सावरू शकला नाही. अक्षर पटेलने वेगवान फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने भारताचा डाव 117 धावांवरच आटोपला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमणासमोर गुडघे टेकले. संपूर्ण भारतीय संघ केवळ 117 धावांच्या स्कोअरवर सर्वबाद झाला.
50 धावांत अर्धा संघ तंबूत
दुसऱ्या वनडेत भारतीय संघाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. 50 धावांच्या आत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना एकही धाव करता आली नाही, तर रोहित शर्मा 13, केएल राहुल 9 आणि हार्दिक पंड्या 1 धावा करून बाद झाला. त्यानतंर विराट कोहली आणि रवींद्र जडेजाही माघारी परतले. त्यानंतर 104 धावांवर भारताने 9वी विकेट गमावली.
केवळ 4 फलंदाज गाठू शकले दुहेरी आकडा
टीम इंडियाचे केवळ 4 फलंदाज दहाचा आकडा पार करू शकले. विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावा फटकावल्या. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने नाबाद २९ धावांची खेळी केली. अक्षरने 29 चेंडूंचा सामना करत एक चौकार, 2 षटकार ठोकले. कर्णधार रोहित शर्माने 13 तर रवींद्र जडेजाने 39 चेंडूत 16 धावा केल्या. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
टीम इंडियाचा डाव 26 षटकांत संपला
अक्षर पटेल एका टोकाकडून भारताचा स्कोअरबोर्ड चालवत होता, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणताही खेळाडू चांगली साथ देऊ शकला नाही. अक्षर पटेल 29 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक गोलंदाज मिशेल स्टार्कने भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याने 53 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 118 धावांचे माफक लक्ष्य दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.