IND vs AUS: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर!

ऑस्ट्रेलियाचा हा दौरा दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण...
IND vs AUS
IND vs AUSSaam TV

अॅरोन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वाखालील T20 विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर 2022 मध्ये भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत दौरा (Australia Tour of India) करणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली विश्वचषकाची (T20 World Cup) तयारी देखील करणार आहे.

ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा 2018/19 मध्ये केला होता. 3 सामन्यांची T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती. ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध पहिली मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असणार आहे. मागच्या अनेक मालिकांमध्ये भारतात ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता आलेली नाही. ही मालिका विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे.

IND vs AUS
युवराजने शेअर केली छोट्या 'युवी'ची पहिली झलक

ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. ही मालिका सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी मालिका दौरा 2016/17 मध्ये केला होता. त्यांनी भारताविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी मालिका गमावल्या आहेत. नवीन ऍशेस विजेता कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली हा दुष्काळ संपवण्यासाठी ते उत्सुक असणार आहेत.

दरम्यान सध्या भारतात आयपीएलचा माहोल सुरु आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू सध्या भारतात आयपीएल खेळत आहेत. आगामी काळात ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. मागचा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. यंदाच्या विश्वचषकात भारत हा विजयाचा प्रबळ दावेदार आहे. कारण भारताचे फलंदाज गोलंदाज सध्या तूफान फॉर्ममध्ये आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com