Ind vs Aus : तो एक क्षण अन् टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर; हरमनप्रीतकडून धोनीच्या चुकीची पुनरावृत्ती

IND Vs AUS, Women’s T20 WC 2023: भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 52 धावा केल्या आणि जोपर्यंत ती क्रीजवर होती तोपर्यंत भारतीय संघ विजयी होईल अशी अपेक्षा होती.
IND Vs AUS, Women’s T20 WC 2023
IND Vs AUS, Women’s T20 WC 2023saam tv

India vs Australia : केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासोहतच ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. परंतु या सामन्यात असे काही घडले की अचानक भारतीय चाहत्यांना एमएस धोनीची आठवण आली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 167 धावा करू शकला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 52 धावा केल्या आणि जोपर्यंत ती क्रीजवर होती तोपर्यंत भारतीय संघ विजयी होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती धावबाद होताच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या झाल्या.

IND Vs AUS, Women’s T20 WC 2023
INDW Vs AUSW: भारताच्या रणरागिणी शेवटपर्यंत लढल्या! पण 'फायनल'चं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभव

हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 2019 च्या विश्वचषकात एमएस धोनी जसा आऊट झाला त्याच पद्धतीने हरमनप्रीत देखील आऊट झाली. यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी धोनी आणि हरमनप्रीतचा रन आऊटचा फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. (Latest Sports News)

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून १७२ धावा केल्या. बेथ मूनीने भारताविरुद्ध 37 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी करत आपला उत्कृष्ट विक्रम कायम ठेवला. ऍशले गार्डनरने 18 चेंडूत 31 धावा केल्या तर कर्णधार मेग लॅनिंगने 34 चेंडूत 49 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. अॅलिसा हिली २६ चेंडूत २५ धावा करून बाद झाली.

IND Vs AUS, Women’s T20 WC 2023
IND vs AUS: भारत - ऑस्ट्रेलिया मालिका सुरू असताना दिग्गजाने केली निवृत्तीची घोषणा! अचानक घेतलेल्या निर्णयाने चाहते हैराण

यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही - हरमनप्रीत

सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. मी आणि जेमी फलंदाजी करत असताना ती गती परत मिळवण्यासाठी खेळत होतो, आम्हाला याची अपेक्षा नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले यापेक्षा दुर्दैवी दुसरे काहीही असू शकत नाही. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचे ठरवले होते. परिणामी निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण आम्ही या स्पर्धेत ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी खूश आहे. आम्हाला माहित आहे की आम्ही हरलो तरी आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com