IND vs BAN : बांगलादेशी आक्रमणासमोर टीम इंडियाची पार दाणादाण; अवघ्या 186 धावांत गुंडाळला संघ

भारतीय संघ सात वर्षांनंतर येथे एकदिवसीय मालिका खेळत आहे.
IND VS BAN
IND VS BANSAAM TV

IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची दमछाक झालेली पाहायला मिळाली. बांगलादेशी आक्रमणासमोर पहिली फलंदाजी करताना भारताला केवळ 186 धावांचा पल्ला गाठता आला. बांगलादेशसमोर 187 धावाचं लक्ष्य ठेवले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ सात वर्षांनंतर येथे एकदिवसीय मालिका खेळत आहे.  (Latest Marathi News)

IND VS BAN
Pele Health Latest Update: महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती खालावली, जगभरातून प्रार्थना

विराट-रोहितसारखे खेळाडू भारतीय संघात परतले असले तरी मालिकेची सुरुवात म्हणावी तशी झालेली नाही. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. सात खेळांडूंना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Cricket News)

टीम इंडियाकडून केएल राहुलने 73, श्रेयस अय्यरने 24, कर्णधार रोहित शर्माने 27 आणि वॉशिंग्टन सुंदरने 19 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिल अल हसनने 5 तर इबादत हौसेनने 4 आणि मेंहंदी हसन मिराजने 1 विकेट घेतली.

IND VS BAN
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; दिग्गज खेळाडू संघाबाहेर

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शिखर धवन 23 धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्माही 27 धावा करून बाद झाला. शाकिबच्या याच षटकात विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीने 9 धावा केल्या. भारतीय संघाने 49 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने भारताची धावसंख्या 92 धावांपर्यंत नेली. श्रेयसही 24 धावा करून बाद झाला.

पाचव्या विकेटसाठी लोकेश राहुलने वॉशिंग्टन सुंदरसोबत 60 धावांची भागीदारी करून भारताची धावसंख्या 150 च्या पुढे नेली. यानंतर सुंदरही 19 धावा करून शाकिबच्या गोलंदाजीवर बाद झाला. सुंदर बाद होताच भारताचा डाव पत्त्याच्या घरासारखा कोसळला.

IND VS BAN
INDvsENG : विराट-v वाद रंगतोय मैदानाबाहेरही; जिमी नीशमचे ट्विट ठरतयं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com