IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात होणार मोठे बदल; या खेळाडूंना मिळणार संधी

IND vs BAN Playing-11: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
ind vs ban Asia cup 2023 possible four changes in team india against bangladesh
ind vs ban Asia cup 2023 possible four changes in team india against bangladeshSaam TV

India vs Bangladesh Playing-11: पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही पराभवाची धूळ चारत टीम इंडियाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आज भारतीय संघाचा सामना बांग्लादेशसोबत होणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी ३ वाजता सामन्याला सुरूवात होईल. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ind vs ban Asia cup 2023 possible four changes in team india against bangladesh
Pak Vs SL : थरथराट...रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानवर श्रीलंकेचा विजय; फायनलमध्ये धडक, भारताशी टक्कर

भारतीय संघात होणार मोठे बदल?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यात आशिया कपमध्ये आतापर्यंत चारही सामने खेळलेले दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली सुद्धा या सामन्यात विश्रांती घेऊ शकतात. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं.

त्याचबरोबर फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना संधी मिळू शकते. दरम्यान, दोन्ही संघाची आकडेवारी बघितली, तर भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ३९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने ३१ तर बांगलादेश संघाने फक्त ७ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईग ११

हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com