भारतीय संघाच्या चिंतेत वाढ; आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

पहाटे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोविड-19 पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने भारतीय संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते.
भारतीय संघाच्या चिंतेत वाढ; आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
भारतीय संघाच्या चिंतेत वाढ; आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह Saam Tv

इंग्लंडमध्ये भारतीय संघ (Team India) कसोटी मालिका खेळण्यास थांबलेला आहे. पहाटे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोविड-19 पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने भारतीय संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. या चिंतेत आणखी भर पडली आहे. भारतीय संघातील सपोर्ट स्टाप मधिल एक जण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच बरोबर कोचिंग स्टापमधिल आणखी तीन जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोविड-19 पॉझिटिव्ह सापडल्यानंतर ऋषभ पंत भारतीय संघासह डरहॅमला जाणार नाही. भारतीय संघ पुढील महिन्यापासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनुसार पंतला सध्या कोरानाची लक्षणे नाहीत, तो सध्या विलगिकरणात आहे. त्याचबरोबर तो संघा सोबत डरहॅमला जाणार नाही.

भारतीय संघाच्या चिंतेत वाढ; आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
IND vs ENG, IND vs SL: मालिकांवर कोरोनाचे सावट; सामने होणार ?

ऋषभ पंत संघात कधी परत येईल याची माहिती अजून मिळालेली नाहीये. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामंतर खेळाडूंना ब्रेक देण्यात आला होता. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गुरुवारी सांगितले की, “ एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे पण तो गेल्या आठ दिवसांपासून तो विलगिकरणात आहे. तो संघासह कोणत्याही हॉटेलमध्ये नाही, म्हणून इतर कोणत्याही खेळाडूवर त्याचा परिणाम होणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com