IND vs ENG: ठरलं! रद्द झालेला पाचवा कसोटी सामना 'या' तारखेला होणार

भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली.
IND vs ENG: ठरलं! रद्द झालेला पाचवा कसोटी सामना 'या' तारखेला होणार
IND vs ENG: ठरलं! रद्द झालेला पाचवा कसोटी सामना 'या' तारखेला होणारTwitter

भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली. सप्टेंबरमध्ये खेळली जाणारी पाचवी कसोटी (Fifth Test Match) कोरोनाच्या प्रभावामुळे (Coronavirus) होऊ शकली नाही. आता क्रिक्रेटप्रमींसाठी गुड न्यूज समोर आली आहे. हा कसोटी सामना पुढील वर्षी 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या दरम्यान ही पाचवी कसोटी खेळली जाणार आहे. सध्या भारताकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी रवाना होणार आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रकही बदलले आहे. टीम इंडिया पाचवी कसोटी 1 ते 5 जुलै दरम्यान खेळणार आहे. त्यानंतर 7 जुलैपासून तीन टी -20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 12 जुलैपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होईल. चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे होता. भारतीय संघात कोविड -19 चे प्रकरण समोर आल्यानंतर पाचवी कसोटी पुढे ढकलण्यात आली होती. आता तीच पाचवी कसोटी पुढील वर्षी होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाच कसोटींच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडिया लॉर्ड्सवर जिंकली. मात्र, इंग्लंडने लीड्समध्ये तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी केली. यानंतर भारताने साऊथम्प्टनमध्ये चौथी कसोटी दणदणीत जिंकली. त्याने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. पाचवी कसोटी मँचेस्टरमध्ये होणार होती, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com