IND vs ENG: भारताने इंग्लंडला केले चारी मुंड्या चित; मालिकेत आघाडी

दोन्ही संघांनी चमदार कामगिरी केली पण भारतीय संघाने चांगला खेळ करत सामना विजयी केला.
IND vs ENG: भारताने इंग्लंडला केले चारी मुंड्या चित; मालिकेत आघाडी
IND vs ENG: भारताने इंग्लंडला केले चारी मुंड्या चित; मालिकेत आघाडीTwiiter/ @BCI

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. त्यातला चौथा सामना (Fourth Test Match) आज इंग्लंडच्या ओव्हाल मैदानावर पार पडला. त्यात भारताला विजय मिळाला आहे. या विजयासह भारतीय संघाने २-१ अशी मालिकेत आघाडी मिळवली आहे. दोन्ही संघांनी चमदार कामगिरी केली पण भारतीय संघाने चांगला खेळ करत सामना विजयी केला. यानंतर पाचवा आणि अंतीम सामना १० सप्टेंबरपासून मँचेंस्टरमध्ये सुरु होणार आहे. पहिला सामना पावसामुळे ड्रा झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला होता. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुन पराभव केला होता.

दरम्यान पहिल्या डावात भारतीय संघ १९१ धावांमध्ये आटोपला होता. फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडून विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतक झळकावले होते. तर इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ५ बळी घेतले होते. इंग्लंडकडून पहिल्या डावात २९० धावा करण्यात आला होत्या.

IND vs ENG: भारताने इंग्लंडला केले चारी मुंड्या चित; मालिकेत आघाडी
CPL 2021: धावबाद झाल्यानंतर खेळाडूला राग अनावर; पाहा काय केले

दुसऱ्या डावात भारतीय संघाचे फलंदाजांनी कमाल केली. हिटमॅन रोहीत शर्माने परदेशातील आपले पहिलेच शतक झळकावत छाप सोडली होती. त्याने १२७ धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांनी डाव सांभाळला आणि भारताला मोठी धावसंख्या उभी करुन दिली. इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. भारताने सामना जिंकण्यामुळे भारताला मालिका जिंकण्याची नामी संधी आहे. पुढचा सामना जरी इंग्लंडने जिंकला तरीही मालिका बरोबरीत सुटणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com