IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीबाबात (Fifth Test Match) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना
IND vs ENGTwitter/ @BCCI

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीबाबात (Fifth Test Match) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेतील विजेत्याचा निर्णय पुढील वर्षी घेतला जाणार आहे. भारतीय संघ (Team India) पुढच्या वर्षी 2022 मध्ये तीन टी- 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आणि आता हे निश्चित झाले आले आहे की या दौऱ्यावर भारतीय संघ अतिरिक्त कसोटी सामना देखील खेळेणार आहे, जो सध्याच्या मालिकेचा भाग असेल आणि आताच्या मालिकेचा निकाल काय असेल हे तेव्हा ठरवले जाईल. एवढेच नाही तर भारतीय संघ या दौऱ्यावर अतिरिक्त टी -20 सामनाही खेळू शकतो.

IND vs ENG
Birthday Special: स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या कर्णधारा'विषयी काही गोष्टी

अर्थात या दौऱ्यावर हा एकमेव कसोटी सामना असणार आहे, परंतु ही कसोटी मालिका मानली जाणार नाही. तोपर्यंत या मालिकेत भारताचा 2-1 पुढे राहणार आहे पाचवा सामना झाला की या मालिकेचा अंतीम निकाल लागणार आहे. जर भारताने पाचवा कसोटी सामना जिंकला तर भारत 3-1 ने मालिकेचा विजेता मानला जाईल आणि इंग्लंडने जर ती कसोटी मालिका जिंकली तर मालिका 2-2 अशी बरोबरी सुटेल. जर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर भारताला 2-1 ने विजेता घोषित केले जाईल.

असे मानले जाते की पाचवा कसोटी सामना न होण्याने ईसीबीला सुमारे 407 कोटी रुपये नुकसान झाले आहे. यातील broadcastसाठी सुमारे 307 कोटी रुपये तर सुमारे 101 कोटी रुपये तिकीट विक्रीतून नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, ईसीबीच्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अतिरिक्त सामने खेळून बीसीसीआय मदत करण्यास तयार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com