IND vs ENG: चौथ्या कसोटीत भारतीय संघ 50 वर्षाचा दुष्काळ संपवणार?

भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत एक सामना जिंकला आहे.
IND vs ENG: चौथ्या कसोटीत भारतीय संघ 50 वर्षाचा दुष्काळ संपवणार?
IND vs ENGTwiiter/ @BCCI

भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) यांच्यात ५ सामन्याची मालिका सुरु आहे. त्यातला तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला आहे. आता चौथा (Fourth Test Match) सामना इंग्लंडच्या ओव्हलमध्ये होणार आहे. पहिल्या तिन सामन्यांचा विचार केला स्ध्या १-१ अशी बरोबरी आहे. एक सामना पावसामुळे ड्रा झाला आहे. मागच्या सामन्यात भारतीय संघाचा १ डाव आणि ७६ धावांनी पराभव झाला आहे.

IND vs ENG
सर्वाेत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशिल राहीन; भाविनाचा निर्धार

भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत एक सामना जिंकला आहे. १३ कसोटी सामने आतापर्यंत भारतीय संघ खेळला आहे. १३ सामन्यांमध्ये भारतीय संघ १ सामना जिंकला आहे तर ७ सामने ड्रा झाले आहेत. ५ सामन्यांमध्ये भारतीय संघाला हार स्विकारावी लागली आहे. आज पासून ५० वर्षापुर्वी भारतीय संघाने १९७१ मध्ये पहिला सामना जिंकला होता. २०१८ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारतीय संघाला ११८ धावांनी हार मिळाली होती. आता भारतीय संघ ओव्हल कसोटी सामना जिंकून इतिहास बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारतीय संघाला मालिकेमध्ये सर्वात डोकेदुखी ठरणारी गोष्ट म्हणजे भारताची मध्यक्रमात असणारी फलंदाजी. सतत फलंदाज फ्लोप ठरत आहेत, आणि नेमकं याचाच फायदा घेवून इंग्लिश गोलंदाज वार करत आहेत. हेडिंगले कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला होता. आता चौथ्या कसोटी भारतीय संघाचा मध्यमक्रम आणि एकंदरीतच संघ कशा प्रकारे खेळतो याकडे लक्ष आहे. चौथा सामना २ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com