
IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यात टीम इंडियात तीन बदल करण्यात आले आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, ईशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. (Sports News)
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ: फिन अॅलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम , ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 113 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला. एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खूप महत्त्वाची आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.