IND vs NZ 1st ODI: न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव, मालिकेत किवीची 1-0ने आघाडी

केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्या 221 धावांच्या भागीदारीमुळे किवी संघाने सात गडी राखून लक्ष्य गाठले.
IND vs NZ
IND vs NZSaam TV

IND vs NZ 1st ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा सात गडी राखून पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाच पराभव झाला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्या 221 धावांच्या भागीदारीमुळे किवी संघाने सात गडी राखून लक्ष्य गाठले. (Sports News)

IND vs NZ
Dinesh karthik Video : 'फिनिशर' दिनेश कार्तिक खरंच संन्यास घेणार? सोशल मीडिया पोस्टद्वारे संकेत

भारताच्या 307 धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. किवी संघाने सुरुवातीच्या 20 ओव्हरमध्ये आपल्या तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर विल्यमसन आणि लाथमची नाबाद भागिदारी निर्णायक ठरली.

न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने (145) सर्वाधिक धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर विल्यमसननेही 94 धावांची नाबाद खेळी केली. फिन ऍलनच्या (22), कॉनवे (24) डॅरिल मिशेल (11) धावा केल्या. भारताकडून उमरान मलिकने दोन आणि शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.

IND vs NZ
FIFA World cup : मेस्सीच्या समोरच रोनाल्डोचा जलवा, गोल डागून रचला इतिहास, पोर्तुगालचा रोमहर्षक विजय

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिलच्या यांनी अर्धशतक साजरं केलं. याच जोरावर सात गडी गमावून टीम इंडियाने 306 धावा केल्या. शिखर धवनने 72, शुभमन गिलने 50, तर श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com