
Virat Kohli Records: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. आजच्या पहिल्या सामन्यात क्रिकेटप्रेमींच विराट कोहलीवर नजर असेल. कारण विराट एका मोठ्या विक्रमाकडे वाटचाल करतोय.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांच्या आकड्यापासून फक्त 119 धावा दूर आहे. विराट कोहली सध्या ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो हा आकडा पार करू शकतो, असा विश्वास देखील अनेकांना आहे.
विराट कोहलीची कारकिर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 268 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12754 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 58.68 आहे तर स्ट्राइक रेट 93.68 आहे. वनडे फॉरमॅटमधील विराटची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे. याशिवाय विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये 46 शतके झळकावली आहेत. (Sports News)
तर 64 वेळा पन्नास धावांचा आकडा पार केला आहे. विराट कोहलीने 104 कसोटी सामन्यांमध्ये 8119 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 115 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. मात्र, विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25,000 धावांच्या आकड्यापासून फक्त 119 धावा दूर आहे.
आजचा सामना कुठे आणि कधी पाहता येईल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी म्हणजे आज हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मोहम्मद शमी.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, सँटनर, ईश सोधी, फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि अटा ब्रेसवेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.