Ind vs NZ 1st T20I : टीम इंडियाने अक्षर-जडेजाला शोधला पर्याय, या घातक ऑलराउंडरची संघात एंट्री

Ind vs NZ 1st T20I : या मालिकेत अष्टपैलू अक्षर पटेल भारतीय संघाचा भाग नाही, त्यामुळे एका घातक ऑलराउंडरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
Ind vs nz 1st t20i Entry of this dangerous all-rounder in the Indian team
Ind vs nz 1st t20i Entry of this dangerous all-rounder in the Indian teamSAAM TV

IND vs NZ 1st T20 Match: एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया २७ जानेवारीपासून पाहूण्या संघाविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. वनडेमध्ये संघाची कमान रोहित शर्माने (Rohit Sharma) सांभाळली होती, आता टी-२० मालिकेत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे.

या मालिकेत अष्टपैलू अक्षर पटेल भारतीय संघाचा भाग नाही, त्यामुळे एका घातक ऑलराउंडरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या या खेळाडूसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. हा खेळाडू नोव्हेंबर २०२२ पासून टीम इंडियासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तो फ्लॉप ठरला होता. मात्र टी-२० मालिकेत तो गेमचेंजर ठरू शकतो.

Ind vs nz 1st t20i Entry of this dangerous all-rounder in the Indian team
IND vs NZ T20 : पहिल्या टी-20 सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का; सलामीवीर फलंदाजच मालिकेबाहेर!

टीम इंडियात या ऑलराउंडरची एंट्री

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतही तो संघात होता. परंतु अक्षर पटेलच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला एकाही सामन्य खेळण्याची संधी मिळाली नाही. आता अक्षरला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली असल्याने वॉशिंग्टन सुंदर हा प्लेइंग 11 चा भाग होण्यासाठी सर्वात मोठा दावेदार आहे.

Ind vs nz 1st t20i Entry of this dangerous all-rounder in the Indian team
Surya Kumar Yadav: सूर्यकुमार जगात भारी! पटकावला सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार

टीम इडियासाठी वॉशिंगटनची कामगिरी

या २३ वर्षीय युवा खेळाडूने भारतीय संघासाठी आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २६५ धावा केल्या आणि ६ विकेट घेतल्या. याशिनाय त्याने टीम इडियासाठी १६ एकदिवस सामने खेळले असून त्यात त्याने १६ विकेट आणि २३३ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने भारतासाठी ३२ सामने खेळले आहेत आणि यात त्याने २६ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच शेवटच्या फळीत खेळताना त्याने ४७ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com