
IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज २९ जानेवारी रोजी लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत भारतासाठी हा करो या मरो असा झाला आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाच्या कॉम्बिनेशनवर चाहत्यांची नजर असेल. भारतीय संघासाठी इशान किशन आणि दीपक हुड्डा यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर सलामीला आलेला इशान किशन फॉर्मबाहेर आहे. ODI आणि T20I चा समावेश करून, ईशानचा गेल्या सात डावांमध्ये स्कोअर 37, 2, 1, 5, 8, 17 आणि 4 आहे. (India vs New Zealand 1st T20I)
जर आपण फक्त ईशान किशनच्या T20 रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने 14 जून 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे अर्धशतक केले. दीपक हुड्डालाही खालच्या फळीतील फलंदाज म्हणून फारसे यश मिळालेले नाही आणि गेल्या 13 डावांमध्ये त्याची सरासरी केवळ 17.88 आहे. त्यात श्रीलंकेविरुद्ध वानखेडेवर केलेल्या नाबाद ४१ धावांचाही समावेश आहे. (Team India)
शुक्रवारी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुड्डाला 10 चेंडूत 100च्या सरासरीने धावा केल्या. या दोन खेळाडूंच्या जागी भारतीय संघ यष्टीरक्षक जितेश शर्मा आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश करू शकतो. असे झाल्यास पृथ्वी ओपनिंग आणि जितेश शर्मा मधल्या फळीत खेळताना दिसतील.
पहिल्या T20 मध्ये पराभव होऊनही वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी भारतासाठी सकारात्मक ठरली. सुंदरने दोन विकेट घेतल्या. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 28 चेंडूत 50 धावा करत तो भारताचा त्या सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
दुसरीकडे, किवी संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. त्यांना पुन्हा एकदा डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.