Ind vs NZ T20 : सिराज-अर्शदीपनं केली कमाल, न्यूझीलंडला १६० धावांवर रोखलं, भारत जिंकणार?

भारतासमोर न्यूझीलंडनं १६१ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
Ind vs NZ 3rd T20/BCCI-Twitter
Ind vs NZ 3rd T20/BCCI-Twittersaam tv

Ind vs NZ 3rd T20 : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या दोघांनी खोचक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजांची दांडी गुल केली. या दोघांच्या अचूक माऱ्यामुळं न्यूझीलंडला १६० धावांवर रोखलं. १९.४ षटकांतच न्यूझीलंडचा अख्खा संघ गारद झाला.

न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर फिन अॅलेन हा स्वस्तात माघारी परतला. त्यानं अवघ्या तीन धावा केल्या. अर्शदीपनं त्याला बाद केलं. दुसरीकडे कॉनवे मैदानात टिच्चून राहिला. त्यानं ५९ धावा केल्या. त्याचवेळी चॅपमॅन हा १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सनं कॉनवेला चांगली साथ दिली. त्यानं ५४ धावा केल्या. कॉनवेला अर्शदीपनंच माघारी धाडलं. तर फिलिप्सला मोहम्मद सिराजनं तंबूत पाठवलं. (Cricket News)

Ind vs NZ 3rd T20/BCCI-Twitter
Ind vs NZ 3rd T20 : रिषभ पंतचा पत्ता कट? ओपनिंग स्पेशालिस्ट 'धाकड' फलंदाजाला मिळणार संधी

फिलिप्स मैदानात असेपर्यंत न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत होता. मात्र, त्यानंतर सिराज आणि अर्शदीपनं केलेल्या खोचक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त वेळ मैदानात टिकून राहू शकले नाहीत. मिशेल १० धावा, जेम्स निशाम हा शून्यावर बाद झाला. सॅंटनर अवघी एक धाव करून माघारी परतला. एकवेळ १४६ धावांपर्यंत ३ बाद अशी स्थिती असताना, नंतरच्या अवघ्या १४ धावांत सात गडी बाद झाले. (Sports News)

Ind vs NZ 3rd T20/BCCI-Twitter
IND vs NZ T20 Match : टीम इंडियानं करून दाखवलं; न्यूझीलंडवर ६५ धावांनी मात, मालिकेतही विजयी आघाडी

अर्शदीप, सिराजची कमाल

अर्शदीप सिंगनं चार गडी बाद केले. त्याने चार षटकांत ३७ धावा दिल्या. तर मोहम्मद सिराजनं अवघ्या १७ धावा देत चार गडी टिपले. हर्षल पटेलनं एक गडी बाद केला. तर भुवनेश्वर, हुडा आणि चहलला विकेट मिळू शकला नाही. चहल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं तीन षटकांत ३५ धावा दिल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com