Ind vs NZ 3rd T20 : रिषभ पंतचा पत्ता कट? ओपनिंग स्पेशालिस्ट 'धाकड' फलंदाजाला मिळणार संधी

कसोटीत स्टार असलेल्या रिषभ पंतला झालंय तरी काय?
Rishabh Pant/File Photo
Rishabh Pant/File Photosaam tv

Ind vs NZ 3rd T20, Team India : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया चांगल्या लयीत असल्याचं दिसतंय. पहिला सामना पावसानं धुतल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं. सूर्यकुमार यादवच्या झुंझार शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यात आली होती. सलामीला संधी दिली, पण त्याची जादू काही चालली नाही. अवघ्या ६ धावा करून तो तंबूत परतला. त्यामुळं पुढच्या सामन्यात त्याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या जागी ओपनिंग स्पेशालिस्ट धाकड फलंदाजाला संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.

अख्ख्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने खेळण्याची संधी मिळालेल्या रिषभ पंतला (Rishabh Pant)न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० संघात संधी मिळाली. इतकंच काय त्याचा फॉर्म परत यावा म्हणून सलामीलाही संधी देऊन बघितली. पण दुसऱ्या सामन्यात १३ चेंडूंत केवळ सहा धावा करता आल्या. त्यामुळं तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रिषभला संघाबाहेर बसावे लागू शकते, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. (Cricket News)

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रिषभ पंतऐवजी शुभमन गिल याला संधी दिली जाऊ शकते. तसं झाल्यास गिल टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. गिल आतापर्यंत टीम इंडियाकडून कसोटी आणि वनडे सामने खेळला आहे. अनेक वेळा त्याने टीम इंडियासाठी ओपनिंग केली आहे. वनडेमध्ये त्याला सलमीला आलेले बघितले आहे. (Sports News)

Rishabh Pant/File Photo
T20 वर्ल्डकपमध्ये मोठा बदल, २० संघ, पात्रता फेरीही नाही; असा असेल नवा फॉरमॅट

गिल आता न्यूझीलंड दौऱ्यात टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना गिल याने १२ सामन्यांत ५७ पेक्षा अधिकच्या सरासरीने ५७९ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. तर आयपीएल २०२२ मध्ये त्याने १६ सामन्यांत ३४.५० च्या सरासरीने आणि १३२.३३ च्या स्ट्राइकनं ४८३ धावा केल्या. टी २० पदार्पणासाठी हे आकडे खूपच चांगले आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rishabh Pant/File Photo
Team India: सूर्यकुमारमुळे विराटची 'ती' जागा जाणार? सूर्यकुमारच्या शतकामुळे टीम इंडियात मोठ्या बदलांची शक्यता

रिषभ पंतला काय झालंय?

कसोटी क्रिकेटमध्ये मॅच विनर असलेला रिषभ पंत टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठेतरी कमी पडतोय असं दिसतंय. पंतने मागील चार इनिंगमध्ये केवळ ४२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७, झिम्बाब्वे विरुद्ध ३, इंग्लंड विरुद्ध ६ आणि न्यूझीलंड विरुद्ध ६ धावा केल्या आहेत. आतापर्यंत ६५ सामन्यांत तो खेळला आहे. त्यात धावांची सरासरी केवळ २२.६९ आहे. तर १२५.७७ च्या स्ट्राइक रेटनं ९७६ धावा केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com