India vs New Zealand : 'सूर्या' तळपला; टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमारच्या शतकामुळे न्यूझीलंडला टीम इंडियाने १९२ धावांचं आव्हान दिलं आहे.
India vs New Zealand match
India vs New Zealand match saam tv

IND vs NZ Match : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादव न्यूझीलंडच्या विरुद्ध खेळताना आक्रमक रुपात दिसला. सूर्यकुमारच्या शतकी खेळीमुळं भारताने न्यूझीलंडच्या विरोधात १९१ धावा काढल्या. नाणेफेक हरल्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताच्या ईशान किशनने सुरुवातीचा काहीसा डाव सावरला. त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमारच्या शतकामुळे न्यूझीलंडसमोर टीम इंडियाने १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाचा (Team India) ३६ धावांवर पहिला गडी बाद झाला. ऋषभ पंतच्या १३ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ईशान किशनने भारताचा डाव सावरत धावसंख्या ५० पर्यंत पोहोचवली. मात्र, ईशान देखील ३१ चेंडूमध्ये ३६ धावा केल्यानंतर बाद झाला. भारताची फलंदाजी सुरू असताना मैदानात पाऊस देखील पडला. मात्र, तरीही सामन्याचे षटक कमी करण्यात आले नाही.

India vs New Zealand match
Rohit Sharma News : टीम इंडियात पुन्हा भूकंप होणार, आता रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने एक हाती मदार सांभाळली. मात्र, दुसरीकडे फलंदाज बाद होत राहिले. श्रेयस अय्यर देखील १३ धावा करून हिट विकेटमुळे बाद झाला. तर कर्णधार १३ चेंडूमध्ये केवळ १३ धावा केल्या. दीपक हुड्डा आणि वाशिंग्टन सुंदरने शून्य धावांवर माघारी परतले. शेवटी सूर्यकुमारने ५१ चेंडूमध्ये नाबाद १११ धावा कुटल्या.

सूर्याने त्याच्या शतकी खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार ठोकले. सूर्य कुमारच्या शतकी खेळीमुळे भारताने १९१ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचा आव्हान दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com