IND vs NZ: आज पहिला सामना; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक अन् संघ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरच्या स्वामी मानसिंग स्टेडियमवर होणार आहे.
IND vs NZ: आज पहिला सामना; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक अन् संघ
IND vs NZ: आज पहिला सामना; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक अन् संघTwitter/ @BCCI

T20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील मालिका सुरु होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 17 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ २ कसोटी सामने खेळणार आहेत. जाणून घेऊया भारत आणि न्यूझीलंडचे वेळापत्रक (IND vs NZ Series Scedule) काय आहे. कोणते खेळाडू संघाचा भाग आहेत?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरच्या स्वामी मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 21 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर तिसरा टी-20 सामना खेळवला जाईल. तिन्ही टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.

IND vs NZ: आज पहिला सामना; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक अन् संघ
मावळमध्ये कुस्त्यांचे फड रंगणार; पैलवानांची कुस्तीची जोरदार तयारी सुरु...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ग्रीन पार्क, कानपूर येथे आणि दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही कसोटी सामने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवले जातील.

भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

भारताचा कसोटी संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com