
नवी दिल्ली: आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सलामीच्या लढतीत लढणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दुबईत भिडतील. दोन्ही देशांचे क्रिकेट (Cricket) चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून ही माहिती दिली.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट (Cricket) देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत, तर पात्रता सामने ओमानमध्ये UAE, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना २० ऑगस्ट रोजी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे.
ही स्पर्धा यावर्षी श्रीलंकेत खेळवली जाणार होती, पण तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आयोजन समितीने ही स्पर्धा यूएईला हलविण्याचा निर्णय घेतला. आशिया कपपूर्वी भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही ६ महिन्यांनी संघात परतणार आहे.
आशिया चषकात टीम इंडियाने (Team India) ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेचा संघ ५ वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना झालेला नाही. भारताने ४ वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.