भारत-पाक सामना दरवर्षी होणार?; रमीज राजांनी ट्विट करत दिली माहिती

PCB अध्यक्ष रमीझ राजा वर्षातून एकदा होणार्‍या Quadrilateral मालिकेचा प्रस्ताव देणार आहेत.
भारत-पाक सामना दरवर्षी होणार?; रमीज राजांनी ट्विट करत दिली माहिती
भारत-पाक सामना दरवर्षी होणार?; रमीज राजांनी ट्विट करत दिली माहितीSaam TV

भारत आणि पाकिस्तान क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्यावर दोन्ही देशातील चाहत्यांना पर्वणी असते. क्रिकेट स्टेडियम जणू रणांगणच वाटू लागते. भारत पाक सामना म्हणेज हातातील सर्व कामं सोडून मॅच पाहायला बसणं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय संबंधांचा दोन्ही देशांच्या क्रिकेटवर (Cricket) मोठा परिणाम झाला आहे. 90 च्या दशकात हा संघर्ष सामान्य होता, तो आता मोठ्या प्रमाणावर फक्त ICC किंवा ACC इव्हेंटमध्ये दिसतो, जे एकतर 2 वर्षे किंवा 4 वर्षांनी येतात. याशिवाय दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रिकेट संबंधही तसेच आहेत. आता पीसीबी प्रमुख रमिझ राजा (Rameez Raja) दरवर्षी भारत-पाकिस्तान सामना होण्यासाठी आयसीसी समोर एक प्रस्ताव मांडणार आहेत. तो प्रस्ताव जर मान्य झाला तर चाहत्यांना दरवर्षी भारत- पाक सामन्याता अनुभव घेता येणार आहे.

PCB अध्यक्ष रमीझ राजा वर्षातून एकदा होणार्‍या Quadrilateral मालिकेचा प्रस्ताव देणार आहेत. यामध्ये 4 संघ सहभागी होणार असून त्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारत-पाक (IND vs PAK) ऍशेसचे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात चतुर्भुज मालिका घेण्यासाठी आयसीसीसोबतच्या पुढील बैठकीत प्रस्ताव मांडणार आहेत.

खुद्द रमीझ राजा यांनी ट्विट करून आयसीसीसमोर हा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, दरवर्षी आम्ही भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या चार देशांदरम्यान टी-20 स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आयसीसीसमोर ठेवणार आहे. ही स्पर्धा चारही देशांमध्ये आलटून पालटून होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान 2013 पासून फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्ये खेळत आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान शेवटचे एकमेकांच्या समोर आले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विश्वचषकात भारताला गट फेरीच्या पुढे जाता आले नाही आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com