IND vs SL 3rd ODI: भारताचा श्रीलंकेविरुद्ध ३१७ धावांनी विजय; वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद

वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता.
Team India
Team IndiaSaam Tv

IND vs SL 3rd ODI: भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2008 मध्ये त्यांनी आयर्लंडचा 290 धावांनी पराभव केला होता. तर भारतीय संघाचा यापूर्वीचा विक्रम 257 धावांनी विजयाचा होता, जो 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध मिळवला होता.

श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना जिंकत भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. टीम इंडियाने 3-0ने मालिका जिंकली. आजच्या सामन्यात विराट कोहली, शुभमन गिल, मोहम्मद सिराज चमकले.

त्याआधी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुभमन गिलने 116 आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 166 धावांची नाबाद खेळी खेळली.

प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 22 षटकांत नऊ गडी गमावून 73 धावा केल्या. अशेन बंडारा दुखापतीमुळे मैदानावर येऊ शकला नाही. अशा प्रकारे टीम इंडियाने 317 धावांनी विजय मिळवला.

Team India
Virat Kohli: विराटसाठी का खास आहे १५ जानेवारी? या दिवशी केलेत अनेक पराक्रम

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आणि एका खेळाडूला धावबाद केले. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

भारतानेही श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना चार विकेटने जिंकला होता.

Team India
IND vs SL 3rd ODI: बाऊंड्री वाचवताना दोन खेळाडू एकमेकांना जोरदार धडकले, स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर, पाहा VIDEO

विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडला...

शतकासह विराटने वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिनलाही मागे टाकले आहे. या यादीत विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध 10 शतके ठोकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर सचिन तेंडूलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेल्या 9 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com