IND vs SL: श्रीलंकेच्या वरिष्ठ संघाची जबाबदारी अंडर-19 संघाच्या कोचकडे

श्रीलंकेचा संघ करत विना कोच सराव करत होता. त्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका IND vs SL मालिकेसाठी संघाची जबाबदारी अंडर-19 संघाच्या कोचकडे सोपविण्यात आली आहे.
IND vs SL: श्रीलंकेच्या वरिष्ठ संघाची जबाबदारी अंडर-19 संघाच्या कोचकडे
IND vs SL: श्रीलंकेच्या वरिष्ठ संघाची जबाबदारी अंडर-19 संघाच्या कोचकडेTwitter/ @SLC

श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवरच्या (Grand Flower) जागी श्रीलंका क्रिकेटने आपल्या अंडर -19 कोचची नियुक्ती केली आहे. फ्लॅावरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि तो विलगिकरणात आहे. एसएलसीकडे (SLC) माजी कसोटी क्रिकेटपटू रॉय डायस, माजी कर्णधार हसन तिलकरत्ने, रुविन पेरीस आणि मलिंथ वर्णपुरा असे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहण्यासाठी होते. परंतू त्यांना डावलून एसएलसीमध्ये रुजू झालेल्या सुदर्शनची निवड मंडळाने केली आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात 13 जुलैपासून 3 टी -20 आणि तीन एकदिवसीय मालिकेचे आयोजन केले होते. परंतू कोरोनामुळे मालिकेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Team India) मालिकेसाठी कसून सराव करत आहे. परंतु दासुन शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंका कोणताही सराव न करता मैदानात उतरेल अशी शक्यता होती. परंतू संघ विना प्रशिक्षक सराव करत होता.

IND vs SL: श्रीलंकेच्या वरिष्ठ संघाची जबाबदारी अंडर-19 संघाच्या कोचकडे
PAK vs ENG: शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा विजय; मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलंबो (Colambo) येथे होणाऱ्या वनडे मालिकेला (ODI Series) आता कोरोनाचा (Corona) फटका बसला आहे. श्रीलंकेच्या गोटातील काहींना कोरोनाची लागण झाल्याने ही सिरीज आता पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता ही सिरीज 13 जुलै ऐवजी 17 जुलै रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com