IND vs SL: राहुल द्रविडने विजयानंतर भावनिक भाषण केले; पहा Video
IND vs SLTwiiter/ @BCCI

IND vs SL: राहुल द्रविडने विजयानंतर भावनिक भाषण केले; पहा Video

बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने संपूर्ण संघाच्या (IND vs SL) प्रयत्नांचे एकत्रित कौतुक केले आहे.

भारतीय संघाने कोलंबोमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय (IND vs SL Second ODI) मिळवल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविडने (Rahul Dravid) खेळाडूंच्या खेळाविषयी प्रशंसा केली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने संपूर्ण संघाच्या प्रयत्नांचे एकत्रित कौतुक केले आहे. सामन्यात दीपक चहरने शानदार फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.

सामन्यात एका वेळी भारत हरेल असे वाटत असताना दिपक चहरच्या धमाकेदार अर्धशतकाने भारताला विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघाने या विजयासह मालिका 2-0 ने जिंकली आहे. द्रविड (राहुल द्रविड) म्हणाला, “आम्ही आश्चर्यकारक विजय नोंदविला आहे. हा विजय अविश्वसनीय आणि नेत्रदीपक आहे. आपण येणाऱ्या परिणामांना योग्य सिद्ध केले आहे. आम्ही जो खेळ केला तो एकदम नेत्रदीपक होता. तुम्ही सर्वांनी चांगला खेळ केला आहे."

राहुल द्रविड पुढे म्हणाला, “यावेळी वैयक्तिक नावांविषयी बोलण्याची योग्य वेळ नाही. साहजिकच सर्वांनी छान खेळ केला. विशेषत: सामना संपल्यावर. आम्ही आमच्या बैठकीत याबद्दल बोललो आहोत. या सामन्यात प्रत्येकाच्या योगदानाचा स्विकार करण्यात आला आहे. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही संपूर्ण सामना पाहता तेव्हा ही खरोखर चांगली कामगिरी होती. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सुरुवातीला फलंदाजी चांगली झाली नाही. पण आम्ही सामना शेवटपर्यंत घेऊन गेलो आणि जिंकलो. हा विजय आवश्यक होता. वेल्डन! "

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com