IND vs WI 2nd Test: पावसाने केला 'गेम', दुसरी कसोटी ड्रॉ; टीम इंडियाचा मालिकेवर १-० ने कब्जा

IND vs WI 2nd Test Match Highlights: भारतीय संघाने ही मालिका १-० ने आपल्या नावावर केली आहे.
team india
team indiasaam tv

IND vs WI 2nd Test Match Result: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. भारतीय संघाने ही मालिका १-० ने आपल्या नावावर केली आहे. (IND vs WI 2nd Test)

team india
Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची 30 व्या वर्षी अचानक निवृत्तीची घोषणा

भारतीय संघाची दमदार फलंदाजी..

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२१ धावांची खेळी केली होती. कर्णधार रोहित शर्माने ८०, यशस्वी जयस्वालने ५७ धावांची खेळ केली होती. शेवटी रविंद्र जडेजाने ६१ आणि आर अश्विनने ५६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडीज संघाला अवघ्या २५५ धावा करता आल्या होत्या. वेस्टइंडीज संघाकडून कर्णधार क्रेग ब्रेथवेटने एकाकी झुंज देत ७५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने ५ गडी बाद केले होते. (Latest sports updates)

team india
IND W vs BAN W: स्टम्प तोडणं अन् अंपायरवर भडकणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC ने केली मोठी कारवाई

वेस्ट इंडीजसमोर ३६५ धावांचे आव्हान..

पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात १८१ धावांवर डाव घोषित केला. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५७ तर ईशान किशनने नाबाद ५२ धावांची खेळी केली.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेस्टइंडीज संघाला शेवटच्या दिवशी विजयासाठी २८९ धावांची गरज होती. मात्र पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. मोहम्मद सिराजला या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे.

यासह भारतीय संघाने भारत - वेस्टइंडीज कसोटी मालिकांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय संघाने २००२ नंतर वेस्टइंडीजविरूद्धची एकही कसोटी मालिका गमावली नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com