IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report
Saam Tv

नवी दिल्ली : इंग्लंडला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिज गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील (India Vs West Indies) पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज 27 जुलै रोजी होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला (Team India) वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. (IND vs WI 3rd ODI Latest Updates)

IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report
IND vs WI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियात होणार बदल; या खेळाडूंना मिळणार संधी?

कारण, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. त्याने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहता पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होणाऱ्या तिसर्‍या वनडेवर पावसाचा पाऊस पडू शकतो असे वाटते.

वास्तविक, जडेजाने स्टेडियमचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात मुसळधार पाऊस पडत असल्याच दिसत आहे. त्यामुळे मैदान कव्हरने झाकले गेले आहे. पावसामुळे भारतीय संघाचे नेट सत्र रद्द झाले आणि जडेजा सराव करू शकला नाही. (IND vs WI 3rd ODI Live Updates)

IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report
CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण

तिसरा सामना रद्द होणार?

Accu Weather च्या अहवालानुसार, बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दिवसभर पावसाची शक्यता 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 5 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि मधूनमधून पाऊस पडू शकतो. तापमान 30 अंशांच्या आसपास असेल. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 20 किमी राहू शकतो. अशा परिस्थितीत जर सामना असेल तर वेगवान गोलंदाजांना या स्थितीत फायदा होऊ शकतो. मात्र, सामना होण्याची आशा फार कमी आहे.

पहिल्या दोन्ही सामन्यांत धावांचा पाऊस

पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये अक्षरश: धावांचा पाऊस पडला होता. दोन्ही सामन्यांतील चारही डावांत 300 हून अधिक धावा बनल्या होत्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 2 चेंडू बाकी असताना 312 धावांचे लक्ष्य पार केलं होतं.

IND vs WI : तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट; जडेजानं सांगितला Weather Report
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील माघारी नंतर नीरज चोप्रा झाला भावूक; देशवासियांना लिहिलं पत्र

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 309 धावांचे लक्ष्य दिले होते, कॅरेबियन संघानेही या लक्ष्याचा पाठलाग केला होता. त्या संघाला शेवटच्या षटकात 15 धावा करता आल्या नाहीत आणि 3 धावांनी सामना गमावला. अशा स्थितीत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

अशी असेल भारताची प्लेईंग- 11

भारत: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रशांत कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com