Shikhar Dhawan Ind vs Zim | शिखर धवनसोबत दगा?; राहुलकडे नेतृत्व दिल्यानंतर क्रिकेट चाहते भडकले, म्हणाले...

आयपीएल २०२२ नंतर के. एल. राहुल (KL Rahul) अनफिट होता. दक्षिण आफ्रिका विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याच्याकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली होती.
Shikhar Dhawan Ind vs Zim
Shikhar Dhawan Ind vs Zim Saam TV

Ind vs Zim Shikhar Dhawan KL Rahul | मुंबई: भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेला १८ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी टीम इंडिया लवकरच रवाना होणार आहे. मात्र, त्याआधी संघात मोठे फेरबदल झाले आहेत. वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनला (Shikhar Dhawan) आधी कर्णधारपद दिलं होतं. पण गुरुवारी बीसीसीआयने घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. के. एल. राहुल फिट झाला आहे. अशा वेळी तो टीम इंडियाचं नेतृत्व करेल, असे जाहीर करण्यात आले.

आयपीएल २०२२ नंतर के. एल. राहुल (KL Rahul) अनफिट होता. दक्षिण आफ्रिका विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याच्याकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, तो अनफिट झाल्यानंतर तो ही मालिका खेळू शकला नव्हता.

इंग्लंड दौऱ्यापर्यंत तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी फिट झाल्यानंतर तो रवाना होण्यापूर्वीच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. आता झिम्बाब्वे दौरा आणि आशिया चषक स्पर्धेआधी तो फिट झाला आहे. बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची फिटनेस चाचणी झाली आणि त्यात तो यशस्वी झाला.

शिखर धवन हा देखील संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद दिलं होतं. मात्र, के. एल. राहुल हा टीम इंडियाचा नियमित उपकर्णधार असल्याने त्याची वापसी झाल्यानंतर शिखर धवनऐवजी आता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

मात्र, हीच बाब क्रिकेट चाहत्यांना खटकली. के. एल. राहुल संघात पुनरागमन करतोय याचा आनंद आहे. पण शिखर धवनकडून नेतृत्व काढून घेणे योग्य नाही, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.

के. एल. राहुल हा ज्युनिअर आहे. तसेच आताच तो बरा होऊन संघात परतला आहे. अशा वेळी शिखर धवनकडेच नेतृत्व द्यायला हवं होतं. तर के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद द्यायला हवं होतं, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

भारताचा झिम्बाब्वे दौरा

पहिला एकदिवसीय सामना - १८ ऑगस्ट

दुसरा एकदिवसीय सामना - २० ऑगस्ट

तिसरा एकदिवसीय सामना - २२ ऑगस्ट

झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघ

के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com